ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मराठी भाषेतून 2020 व 2021 या वर्षी युपीएससी परीक्षेत यश मिळविणार्या श्री. सुब्रमण्यम् केळकर करणार फेसबुक लाईव्ह द्वारा मार्गदर्शन....!

मराठी भाषेतून 2020 व 2021 या वर्षी युपीएससी परीक्षेत यश मिळविणार्या श्री. सुब्रमण्यम् केळकर करणार फेसबुक लाईव्ह द्वारा मार्गदर्शन....!

प्रकाशन: 08 Nov 2021 07:45 PM
वाचन संख्या 552

उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहापासून होणार फेसबुक लाईव्ह..!

ओरोस | प्रतिनिधी : यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  आणि प्रेरणा अंतर्गत मुळचे जिल्ह्यातील चिंदर गावातील परंतु, सद्या तामिळनाडू येथे कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम भालचंद्र केळकर यांचे उद्या मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत मार्गदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे श्री. केळकर यांनी मराठी भाषेतून http://localhost/news/public/uploads/2020 व http://localhost/news/public/uploads/2021 या वर्षी युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. उद्या होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे हे उपस्थित राहणार आहेत.
श्री. केळकर यांचे शालेय शिक्षण चिंदरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून, मालवण येथील टोपीवाला महाविद्यालयातून त्यांनी 11 वी व 12 वीचे शिक्षण घेतले आहे. तसेच ओरोस येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरल बिझीनेस मॅनेजमेंट मधून बीबीएमची पदवी संपादन केली आहे. वेलींगकर इंस्टीट्युट मधून पदव्युत्तर पदवी मिळविली असून, त्यांनी  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्रामधून एम.ए ची पदवी मिळविली आहे. राज्यशास्त्रामध्ये  ते नेट जी आर एफ उत्तीर्ण झाले आहेत. http://localhost/news/public/uploads/2020 मध्ये आय.पी.एस. झाले असून, सध्या तामीळनाडूमध्ये कार्यरत आहेत.
यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुकलाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492  ऑनलाईन होत आहे.  यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स