कूलनेसच्या 'ऑरा' ने नटलेले मालवणचे उद्योजक श्री. परशुराम पाटकर...!
कूलनेसच्या 'ऑरा' ने नटलेले मालवणचे उद्योजक श्री. परशुराम पाटकर...!
विशेष : आपण, आपल्या बालपणापासून, आपल्या गावात, शहरात किंवा परिसरात काही माणसांना त्यांच्या कूल ऑरासकट पहात आलेले असतो. अर्थात बालपणी कूलनेस, ऑरा वगैरे शब्दांचे अर्थ माहीत नसतात म्हणून आपण त्यांना 'ग्लॅमरस' समजत असतो.
आपण, थोडं मोठं झाल्यावर... जाणीव होते की ही माणसं ग्लॅमरस, दबंग, चमकोगिरी किंवा हिरोगिरीतली नसून त्यांच्यातल्या कूलनेसचा 'ऑरा' त्यांच्यासोबत चालवत असतात...किंवा तो ऑरा त्यांच्याभोवती असतो हे दाखवावं लागत नाही तर दिसत जात असतं.
मालवणचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री. परशुराम पाटकर हे सुद्धा त्याच कूलनेसच्या ऑराचं एक वलय राखणारं व्यक्तीमत्व...!
उद्योजकता, व्यवसाय, किंवा विविध कार्यक्रमांतला त्यांचा 'ग्रेसफुल' वावर हा त्यांच्या प्रभातफेरीला अर्थात माॅर्निंग वाॅकला किंवा रात्रीच्या शतपावलीला देखिल 'कायम' असतो. स्वतःतील स्वतःला 'वठवता' येत नसतं तर ते तसं असावं लागतं.
शहरात, १९९० च्या दशकामधल्या, गुणग्राहक किंवा सुशोधक आधुनिक युवकांच्या यादीत सुद्धा त्यांची नक्कीच गणना होऊ शकते.
त्यांची डेनिम कापडाच्या पॅन्ट तथा जीन्समधली स्टाईल स्टेटमेंट अगदी तत्कालीन ट्रेंड सेटर्समधला 'बिग बाॅस' बनवून जात असायची. त्यांच्या जीवनातील विविध 'शह - प्रतिशह' यांना सबब न बनवता त्यांना 'चेस - बोर्ड' समजून नटलेली अशीच चेक्स कपड्यांत शोभणारं त्यांचं फॅशन स्टेटमेंट आजही सजीव असतं..!
अर्थात आता, त्यात त्यांनी मेहनतीने, बुद्धीने प्राप्त केलेले जीवनरुपी बुद्धीबळाच्या पटावर वाढत जाणारे 'पांढरे चौकोन' त्यांच्या ऑराचा कूलनेस आणि कूलनेसचा ऑरा किती सात्विक आहे ह्याची साक्ष देतायत..!
ऑरा म्हणजे सजीवाभोवतालचं अदृश्य ऊर्जेचं वलय असतं. खूपदा ऊर्जा म्हणली की 'धूर...जाळ....गर्मी' वगैरे जाणिवा नजरेसमोर येतात पण जीवनात किती, काय, कसं, का आणि मन 'हेलावल्याचा' कार्बन वावरात न आणता चालणारी माणसं 'कूल परशुराम पाटकर' म्हणून ओळखली जातात.
आज १३ एप्रिल....! उद्योजक परशुराम पाटकर यांचा वाढदिवस. विविध माध्यमातून, उद्योजक श्री. परशुराम पाटकर यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छा येत आहेत.
©लेखन : सुयोग पंडित, मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)