श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांचे उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या घुमडे येथील श्री घुमडाई देवी मंदिरात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून सोमवार दि. १२ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सग्रह नवचंडी यागचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. विजय सुरेश मालप यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सर्वांच्या कल्याणासाठी हा धार्मिक विधी करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन व धार्मिक विधींचा लाभ घ्यावा, तसेच दोनही दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१२ ऑक्टोबर २०२६ रोजी नवचंडी यागाच्या पहिल्या दिवशी प्रायश्चित्त, देवांना नारळ व विडे समर्पण, संकल्प, गणेश पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्य-ऋत्विक वरण, देवता आवाहन, सप्तशती पाठ वाचन, कुंकूमार्चन, आरती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
१३ ऑक्टोबर २०२६ ला दुसऱ्या दिवशी आवाहित देवता पूजन, अग्निस्थापना, नवग्रह देवता स्थापना, नवग्रह होम, सप्तशती पाठ हवन, कुंकूमार्चन, बलिदान,
पूर्णाहुती, उत्तरांग कर्म, महानैवेद्य, आरती व प्रार्थना हे विधी पार पडणार आहेत. यानंतर सुहासिनी पूजन व ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शारदीय नवरात्रीच्या पवित्र पर्वात आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीच्या चरणी प्रार्थना करावी आणि दोन्ही दिवसांच्या धार्मिक सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)