ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कुडाळ माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

कुडाळ माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन.

कुडाळ माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन. 

Article image

मसुरे | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात पहाटे ५ वाजता संकल्प, सकाळी ६ वाजता गुरूमंत्र, सकाळी ८ वाजता स्वामींच्या मठात धार्मिक विधी, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती, सकाळी ११ वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा, ११:३० वाजता दहावी - बारावी व योग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, दुपारी १२ वाजता सद्गुरुंचे प्रबोधन मार्गदर्शन, १ वाजता सद्गुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद, दुपारी २:३० वाजता स्वरसाई आरती मंडळ म्हापसा, गोवा यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता गोपाळकृष्ण रवळनाथ आरती मंडळ एकोशी यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता स्वामींची नित्य आरती, सायंकाळी ७:३० वाजता मोरेश्वर महिला फुगडी मंडळ नेरूर वाघचौडी यांचा पारंपारिक फुगडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 


तरी भाविक भक्तगणांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्रींचे व सदगुरू माऊलीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गावडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स