ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची राजकीय पक्षांना माहिती.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची राजकीय पक्षांना माहिती.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शनपर बैठक.

Article image


नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात तरिणी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत प्रारूप मतदार यादीची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत दावे व हरकती सादर करण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते. 


यावेळी राजकीय प्रतिनिधींना विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादीची माहिती देण्यात आली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.


प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलांबाबत काही त्रुटी असल्यास किंवा पात्र मतदाराचे नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.


बैठकीत उपस्थित नोंदणीकृत राजकीय प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वाटप करण्यात आले. मतदार यादीचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, या प्रक्रियेसाठी नागरिकांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 584

लोकप्रिय टॅग्स