रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे वितरण.
रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे वितरण.
मालवण | प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ शैक्षणिक ॲपचे वितरण भंडारी हायस्कूल, मालवण येथे करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि सरावाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरणार असून, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळण्यास मदत होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे पदाधिकारी, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रो. नीलम जोशी, सचिव रो. प्रविणा शिंदे, खजिनदार रो. प्रदीप सामंत, इव्हेंट को - ऑर्डिनेटर रो. डॉ. लीना लिमये तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
‘Create Lasting Impact’ या रोटरीच्या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारा ठरला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला रो.सुहास ओरसकर, रो. तांबे, रो. रमाकांत वाक्कर आणि रो. महादेव पाटकर यांच्यासह रोटरी क्लब डोंबिवली सन सिटीचे अमोल कामत, वंदना कामत आणि रोटरी क्लब कणकवलीतर्फे नितीन बांदेकर,वर्षा बांदेकर, नयना केसरकर तसेच भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे आणि सहकारी उपस्थित होते. यातील १४० ऍप, रोटरी क्लब मालवण रो. प्रविणा शिंदे आणि १५० ऍपस रो. डॉक्टर लीना लिमये यांनी प्रायोजित केली. या ऍपचे शाळानिहाय वितरण खालीलप्रमाणे आहे.
भंडारी हायस्कूल, मालवण - ६६
शांतादुर्गा हायस्कूल, वडाचा पाट - १०, जय गणेश स्कूल, मालवण- ४४, कन्याशाळा, मालवण - २०, भरतगड प्रशाला - १४, बागवे हायस्कूल ११, रेकोबा हायस्कूल २३, देवबाग प्रशाला १३, ओझर विद्यामंदिर २३, माळगाव प्रशाला १५, वायंगणी प्रशाला २५, मसुरे व इतर शाळा २६.
एकूण - मालवण २९०
रोटरीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन राष्ट्र समर्पित क्रांतिकारकांच्या कृतज्ञतेत साजरा.
मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.