ताज्या बातम्या
रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे वितरण. वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार. 'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद,' ..तरी ही केस अपवादाच्या कक्षेतच.....! संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी. ईद - ए- मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करण्याचे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन. जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ. गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर. श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना. श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा. कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.
वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार.

वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार.

Article image


मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी प्रश्नावर बैठक.

Article image

सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे निर्णय घेण्याचे मंत्री अतुल सावे यांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश.


मुंबई | ब्यूरो न्यूज : वैश्यवाणी समाजाच्या 'ओबीसी' जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार व आमदार किरण सामंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळत असून मंत्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच माननीय उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वैश्यवाणी समाजाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आज २५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्री अतुल सावे यांनी सन २००८ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे आवश्यक शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.


वैश्यवाणी समाजाच्या जुन्या शासकीय अभिलेखांमध्ये ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ आणि ‘वाणी’ अशा वेगवेगळ्या नावांनी नोंदी आढळत असल्याने पात्र नागरिकांना OBC जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, युवकांच्या नोकरीच्या संधी आणि 'OBC प्रवर्गातील विविध शासकीय सवलती मिळविताना' या नोंदीतील फरकामुळे अडथळे निर्माण होत होते.


ही समस्या लक्षात घेऊन आमदार प्रमोद जठार यांनी दि. २० जून २००८ रोजीच्या शासन परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. या मागणीसाठी त्यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.


आजच्या सकारात्मक निर्णयामुळे सन २००८ च्या परिपत्रकाप्रमाणे शासन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, ‘वैश्य’, ‘वैश्यवाणी’ व ‘वाणी’ अशा नोंदींमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा आहे.


तसेच, वैश्यवाणी समाजाचा OBC यादीतील क्रमांक १९० वरील समावेश अबाधित ठेवून, पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणीची प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता यावी, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.



आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वैश्यवाणी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या OBC जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. याबद्दल समाजाच्या वतीने आमदार प्रमोद जठार, मंत्री अतुल सावे तसेच मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


'वैश्यवाणी समाजाला त्यांच्या हक्काचे 'ओबीसी' लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार,' असा निर्धार आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स

ताज्या बातम्या