मांडकुली केरवडे येथे 'सायबर सुरक्षा अभियान - २०२६' संपन्न.
मांडकुली केरवडे येथे 'सायबर सुरक्षा अभियान - २०२६' संपन्न.
सिंधुदुर्ग पोलीस दल, कुडाळ विभाग व एम. के. सी. एल. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथे सिंधुदुर्ग पोलीस दल, कुडाळ विभाग व एम.के.सी.एल. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायबर सुरक्षा अभियान - २०२६' अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम व सायबर गुन्हे जनजागृती, सुरक्षित सिंधुदुर्ग जागृती अभियान संपन्न झाले. हे अभियान शनिवार, २७ जून रोजी बिबवणे येथील लक्ष्मीनारायण हायस्कूल व आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय, मांडकुली - केरवडे येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जयदीप पाटील व श्री. अनिल पाटील यांच्या निर्देशानुसार कुडाळ सहाय्यक उपनिरिक्षिका ममता जाधव एम. के. सी. एल. सिंधुदुर्गच्या वतीने श्री. देवेंद्र गावडे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्राचा जवळपास ३५० ते ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या सत्रात सहभाग दर्शवला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)