ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण लायन्स क्लबच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण लायन्स क्लबच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

मालवण लायन्स क्लबच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात लायन्स क्लब मालवणच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत फाटक शाळा, रेवतळे येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम संपन्न झाला. 


यावेळी वक्तृत्व स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भाविका धीरज सोनगत यांनी द्वितीय तर हार्दिक महेश दाभोलकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच समृद्धी कैलास माने, संचित कमलाकांत मसुरकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.


यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, ज्येष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी आदी लायन्स सदस्य तसेच शिक्षक देविदास नामदेव प्रभुगांवकर, महादेव श्रीहरी घोडके व विद्यार्थी उपस्थित होते.


स्पर्धेतील सर्व पारितोषिक ज्येष्ठ लायन्स सदस्या जयश्री हडकर यांनी पुरस्कृत केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स