ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
चिवला बीच येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिवला बीच येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ.

चिवला बीच येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ. 

Article image

आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वासनपूर्ती. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील चिवला बीच, समूलबाग येथे विजेची समस्या जाणवत असल्याने नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. चिवला बीच समूल बाग महापुरुष मंदिर येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


चिवला बीच समूलबाग येथे दरवर्षी पावसाळ्यात व्होल्टेजची समस्या उद्भवत होती. त्यामुळे तेथील विद्युत प्रवाह खंडित व्हायचा. ही समस्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी तेथील ग्रामस्थांनी सौ. ममता वराडकर यांच्या समोर मांडली होती. त्यावेळी या समस्येवर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन सौ. वराडकर यांनी दिले होते. हे आश्वासन सौ. वराडकर यांनी पूर्ण केले असून चिवला बीच समूल बाग येथे १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ तेथील श्री. देव महापुरुष यांना गाऱ्हाणे घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरम्यान, ट्रान्सफॉर्मर साठी आवश्यक जागा व जागा सफाईसाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.


यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, मनमोहन वराडकर, भाई कासवकर, आबा शिर्सेकर, शिवाजी केळुसकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, रूजाय फर्नांडिस, संतोष सावंत, संतोष परब, शैलेश चिंदरकर, गणेश चिंदरकर, हर्षल मयेकर, महेश मयेकर, राज कांदळगावकर, सुधीर कांदळकर, हर्षद सावंत, रतन मयेकर, मनोज शिरोडकर, विजय केळुसकर, अर्षद खटखटे, राहुल कीर, प्रफुल्ल मयेकर, शशांक कुबल, सुशांत करंगुटकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 528

लोकप्रिय टॅग्स