ताज्या बातम्या
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ. ​वडाचापाट येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबिर. मालवणात बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. मालवण शिवसेना बीएलए सयन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर. चिवला बीच येथे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मर कामाचा शुभारंभ. पद्मश्री डाॅ. डि. वाय. पाटील कालवश. बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा. मालवण पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची पदभार स्विकृती. 'और बहुत बढ़ीया...व्हाॅईस ऑफ मिडिया...!' व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
'और बहुत बढ़ीया...व्हाॅईस ऑफ मिडिया...!'

'और बहुत बढ़ीया...व्हाॅईस ऑफ मिडिया...!'

'और बहुत बढ़ीया...व्हाॅईस ऑफ मिडिया...!'

Article image

व्हॉइस ऑफ मीडियाची महाराष्ट्र प्रदेश नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हर्षवर्धन. 


विजय चोरडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आणि अजितदादा कुंकलोळ, नरेंद्र देशमुख नवे विभागीय प्रदेशाध्यक्षपद तर सिंधुदुर्गाचे परेश राऊत व समिर महाडेश्वर राज्य कार्यकारिणीत.


ब्यूरो न्यूज : व्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अनुभवी व नवोदित पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत राज्यातील सर्व विभाग आणि जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजय चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजितदादा कुंकलोळ आणि नरेंद्र देशमुख यांची विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी मिलिंद टोके आणि महेश पांचाळ, राज्य सरचिटणीसपदी गजानन देशमुख व सचिन मोहिते, राज्य उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, चंद्रशेखर भोयर, अभिजीत दरेकर आणि गणेश जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य संघटक म्हणून लक्ष्मण बगाडे, राहुल धोका, जयेश काटे आणि इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली आहे. कार्यवाहक म्हणून तानाजी घोडके, वैभव मोहिते, अमित बागडे, संजय तीपाले, राजू कापसे, गजानन बाजारे, अशोक मिश्रा, मुकुंद जोशी, अनिल चव्हाण आणि रखमाजी सुपारे यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवक्तेपदी नरेश पाटील, प्रमोद पानबुडे, रुपेश जाधव आणि आशिष शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून खजिनदार म्हणून गायत्री ढवळे आणि परेश राऊत यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


सहसंघटक म्हणून अहमद नूर, सुरेश जगताप, समीर माडेश्वर आणि अनिल करंदकर, सहसरचिटणीस म्हणून प्रशांत गोडसे, धनंजय कपाले, गुरुदास गुरुमुळे आणि ओंकार हिंगमिरे, तर सहकार्यवाहक म्हणून मलिकार्जुन धारूरकर, दीपक ढवळे, अरुण मोडक आणि शेख लाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. राज्य संयोजक म्हणून गोरक्षनाथ नेहे, ॲड. नीतू विश्वकर्मा, राकेश कलाल, रियाज मुल्ला, संजय घेवारे, सोमनाथ पवार, महेंद्र पवार, मनोज कामंडी, संतोष चराटे आणि अब्दुल आतिक यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.


नवीन कार्यकारिणीत राज्यातील सर्व विभाग व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही टीम कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया म्हणाले, “पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घरकुल, अद्ययावत तंत्रज्ञान, पेन्शन, अधिस्वीकृती तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया राज्यभर संघटित आणि प्रभावी लढा उभारेल. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पत्रकारांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असेल.”


प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकलोळ म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पत्रकारांचे स्थानिक प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मजबूत संघटन उभी करत सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करू. व्हॉइस ऑफ मीडियाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”


प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख म्हणाले, “पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि सामाजिक सन्मान यासाठी विभागीय स्तरावर सक्षम संघटन उभारून प्रत्येक जिल्ह्याशी समन्वय साधला जाईल.”

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के म्हणाले, “मुंबई येथे जाहीर करण्यात आलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यकारिणीचे मी मनापासून स्वागत करतो. ही कार्यकारिणी निवडताना सर्व विभाग आणि जिल्ह्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बहुतांश पदाधिकारी हे नवे असून नव्या उत्साहाने महाराष्ट्रभर संघटन बळकट करण्यासाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी ही टीम निश्चितच यशस्वी ठरेल.”

Article image

परेश राऊत


Article image

समीर म्हाडेश्वर


पत्रकारांसाठी, 'सदैव सात्विक संघटनात्मक ठामपणाने' कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम बद्दल 'सबसे बढ़ीया, व्हॉईस ऑफ मीडिया,' या प्रशंसेसह आता 'और बहुत बढ़ीया...व्हाॅईस ऑफ मिडिया...,' अशा आशयाच्या उत्स्फूर्त आनंदाच्या प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता वर्तुळातून व्यक्त होत असून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स