ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Article image

               

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी येथे २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. दुग्ध अभिषेक, सकाळी ७:३० वा. नित्य आरती, सकाळी ९:०० वा. अभिषेक, सकाळी १०:०० ते सायंकाळी ९:०० वा. सुस्वर भजने, दुपारी १२:३० वा. महाआरती, दुपारी १:०० वा. महाप्रसाद, श्री स्वामी समर्थ (यांना गुरु घेणे) गुरुदिक्षा हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. 


या उत्सवानिमित्त सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी तिर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मठातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने अध्यक्ष दीपक सुर्वे, उपाध्यक्ष दिनेश साळकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सरचिटणीस सुनिल खरात, चिटणीस कल्याण साळकर, खजिनदार प्रफुल्ल माळकर व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स