ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकवटले.

सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकवटले.

सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकवटले.



सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज.

भारतीय न्‍याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील तरतुदीनुसार तात्‍काळ कठोर कारवाईची मागणी.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणाऱ्यांची उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्‍या महिला अधिकाऱ्यांची व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच जिल्‍हा प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्‍याबद्दल जीवन कुडाळकर विरोधात जिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जिल्‍हाधिकारी तृप्‍ती धोडमिसे, सिंधुदुर्ग यांजकडे लेखी तक्रार तथा निवेदन देण्‍यात आलेले आहे. हे निवेदन देताना कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित व्‍यक्‍तीने महिला अधिका-यांबद्दल जाणीवपूर्वक खोटी, चुकीची, बदनामकारक माहिती फेसबुकवर पोस्‍ट करुन संबंधितांना मानसिक त्रास दिल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. त्‍यामध्‍ये जीवन कुडाळकर, रा.आडेली, ता. वेंगुर्ला याच्याविरुद्ध सदर प्रकरणात कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आली आहे.

या व्यक्तीने अंदाजे ७ ते ८ महिन्यांपूर्वी जिल्‍हाधिकारी कार्यालयात येऊन श्रीम. चैताली सावंत, तहसिलदार (महसूल) यांचा नकार असतानाही अनधिकृतपणे व्हिडिओ चित्रीकरण केले होते असा आरोप करून संबंधित व्हिडिओ स्वतःच्या सोयीनुसार एडिट करून दिनांक २३ जुलै २०२६ रोजी रात्री फेसबुकवर अपलोड केला अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये 'गेल्या ३ वर्षांपासून BSNL टॉवरचे काम रखडवले,' असा खोटा आरोप यामध्‍ये करण्‍यात आला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तर श्रीम. चैताली सावंत यांनी तहसीलदार (महसूल) या पदाचा पदभार घेऊन केवळ १ वर्ष १० महिने झाले आहेत. तसेच BSNL टॉवर उभारणीकरिता शासकीय जमीन प्रदान करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक ०१/०६/२०२३ रोजीच पूर्ण झाले असून, पुढील तांत्रिक व क्षेत्रीय कामे ही थेट BSNL कार्यालयाशी संबंधित आहेत असे असतानाही केवळ व्यक्तिगत आकस आणि अधिकारी वर्गाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या हेतूने हा बनाव रचण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे असा गंभीर तक्रार करुन आरोप दाखल करण्यात आली आहे. तसेच सदरची व्‍यक्‍ती वारंवार कार्यालयातील विविध शाखांमध्‍ये वावरत असल्‍याचे दिसून येत असून, त्‍यामुळे अधिकारी - कर्मचारी यांच्‍या मध्‍ये भितीचे तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्‍याचे या निवेदनात नमुद केलेले आहे. संबंधित व्‍यक्‍तीकडून केवळ एकाच महिला अधिका-याला नव्‍हे, तर निवासी उपजिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी, तहसिलदार वेंगुर्ला, मंडळ अधिकारी, सहायक महसूल अधिकारी यांचेही अनधिकृत चित्रीकरण करुन त्‍यांचे देखील व्हिडीओ सोशल मिडीयावर चुकीच्‍या पध्‍दतीने फेसबुकवर प्रसारित केलेले आहे. तसेच जिल्‍हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्ग, भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग, महावितरण कार्यालय इत्‍यादी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे देखील व्हिडीओ चुकीच्‍या पध्‍दतीने कुडाळकर यांच्याकडून प्रसारित करण्‍यात आलेले आहेत. 

संबंधित व्यक्ती वारंवार कार्यालयात येऊन परवानगी नसताना अधिका-यांचे तसेच कर्मचा-यांचे चित्रीकरण करुन असे व्हिडीओ समाजमाध्‍यमांवर प्रसारीत करुन लोकांमध्ये महिला अधिका-यांची तसेच प्रशासनाची बदनामी करत आहे. चुकीची आणि खोटी माहिती देऊन अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण करणा-या, महिला अधिकाऱ्यांबद्दल चुकीच्या भावना समाजात पसरवून त्यांच्या आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणा-या, तसेच त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्यांना अपमानास्पद वाटेल, समाजात वावरताना त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होईल, अशा प्रकारच्या भावना जाणीवपूर्वक पसरवणाऱ्या जीवन कुडाळकर या व्‍यक्‍तीवर भारतीय न्‍याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील तरतुदीनुसार तात्‍काळ कठोर कारवाई करण्‍याची मागणी सिंधुदुर्ग जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडून जिल्‍हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्‍यात आली आहे. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 213

लोकप्रिय टॅग्स