अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५ ते ६ वर्षांपासून वृक्षतोड झाल्याचा निळेली ग्रामस्थांचा आरोप...!
अधिकाऱ्यांच्या संगनमताने ५ ते ६ वर्षांपासून वृक्षतोड झाल्याचा निळेली ग्रामस्थांचा आरोप...!
निळेली प्रक्षेत्रामधिल वृक्षतोडीच्या परवानग्यांबाबत देखिल प्रश्न.
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पशु पैदास केंद्र, निळेलीच्या प्रक्षेत्रामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साग, खैर, कीनळ, आकेशिया आदी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तोड झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वृक्षतोडीसाठी मात्र संबंधित आवश्यक त्या परवानग्या वनविभागाकडून घेण्यात आल्या होत्या का, याबाबतही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही वृक्षतोड पशु पैदास केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत चौकशीची तक्रारही करण्यात आली होती परंतु त्याकडे बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही संबंधित यंत्रणा आणि वनविभागाने काहीच कारवाई केली नसल्याचे दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची संपूर्ण निष्पक्ष चौकशी करून वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)