ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वटपौर्णिमा सण भक्तीपूर्ण उत्साहात.

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वटपौर्णिमा सण भक्तीपूर्ण उत्साहात.

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वटपौर्णिमा सण भक्तीपूर्ण उत्साहात.

Article image


अक्कलकोट | प्रतिनिधी : प्रतिवर्षाप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात, यंदाही सौभाग्यवतींनी वटवृक्षाला सौभाग्याची दोरी गुंडाळत वटवृक्षाची पूजा केली. यावेळी सौभाग्यवती महिलांनी साजरा केलेल्या या उत्सवाप्रित्यर्थ चेअरमन महेश इंगळे यांनी प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ब्रम्हांडनायक श्री. स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील वटवृक्ष हा केवळ एक वृक्ष नसून तो साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रतीक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी या वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचीच पूजा केल्याचे समाधान अनेक सौभाग्य वतींना लाभते. आपल्या भारतीय संस्कृतीतील या पवित्र सणाची परंपरा जपण्यासाठी श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सदैव कटिबद्ध असल्याची आस्थापूर्वक ग्वाही देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

Article image

चेअरमन महेश इंगळे म्हणाले की भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला व वडपूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. आज पहाटे ६ वाजल्यापासून असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेस वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली ही वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगांवाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती, तसेच दरवर्षी वडपूजे करिता येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे असे महेश इंगळे यांनी आवर्जून सांगितले.

    

देवस्थान समितीच्या वतीने पूजेसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. पहाटे ४ वाजल्या पासूनच भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. तसेच भक्तांच्या दर्शनाच्या व इतर सोयीकरिता व त्यांच्या सुरक्षितते करिता समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. दिवसभर मंदिरात स्वामींच्या नामस्मरणाच्या जयजयकार होत आहे. 


यावेळी देवस्थानचे पुरोहित मंदार पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, संतोष पराणे, दीपक जरिपटके, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स