पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजपाच्या वतीने श्री. देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे अभिषेक व धार्मिक विधी.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजपाच्या वतीने श्री. देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे अभिषेक व धार्मिक विधी.
पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी आणि बहुविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस २३ जून २०२६ रोजी मालवण तालुका भाजपाच्या वतीने धार्मिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. यावेळी श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे अभिषेक व धार्मिक विधी करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर, महेश मांजरेकर, संतोष पारकर, प्रकाश तोंडवळकर, विजय निकम, मंगेश चव्हाण, संदीप हडकर, बाळू राणे, सत्यवान लोके यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)