ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मालवण नगरपरिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Article image

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांचे पर्यावरणाच्या पूरकतेसाठी 'विशेष हरित आवाहन.'

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या वतीने ११ जून २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाद्वारे, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी प्रतीक थोरात व नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त नगरपरिषद परिसरात ही वृक्षारोपण मोहीम संपन्न झाली. 

 Article image


यावेळी मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्यासह मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मालवण शहराला अधिक हरित, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याचा संकल्प राबवण्यात आलेल्या या मोहिमेत पालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी सहभागी झाले होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, सभापती व नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून व रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चा फलक प्रदर्शित करण्यात आला.


वृक्षारोपण प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या की, केवळ ५ जूनला पर्यावरण दिन साजरा करून न थांबता, निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मालवण नगरपरिषद शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. दरम्यान नगराध्यक्षा ममता वराडकर यांनि 'माझी वसुंधरा' आणि 'स्वच्छ भारत अभियान २.०' अंतर्गत आपण आपले प्रभाग आणि परिसर पर्यावरणपूरक बनवायचे 'विशेष हरित आवाहन' केले. 


या मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष, पालिकेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष खड्डे खणून व रोपे लावून श्रमदान केले. तसेच पालिकेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनीही नवीन लावलेल्या झाडांना पाणी घालत या उपक्रमात सहभाग नोंदवला. पालिकेच्या या उपक्रमामुळे नगरपरिषद परिसराला एक नवी हिरवाई प्राप्त झाली असून, शहरामध्ये पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश गेला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स