पोईप वि.का.सहकारी सोसायटी चेअरमनपदी श्री विठ्ठल नाईक तर वाईस चेअरमनपदी राजेंद्र पालव यांची बिनविरोध निवड..!
महाविकास आघाडीने मिळवले आहे सोसायटी निवडणुकीत भरघोस यश…!
पोईप | ओंकार चव्हाण : मालवण तालुक्यातील बहुचर्चित पोईप विकास सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास पॅनेलच्या १३ पैकी १२ उमेदवारांनी विजय मिळवून अखेर गेली १७ वर्षे राणे समर्थकांच्या ताब्यात असलेली संस्थेवरील सत्ता संपुष्टात आणून महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास आघाडी पॅनेलचे विठ्ठल नाईक, राजेंद्र पालव, दिगंबर माधव, नारायण पालव, संतोष हिवाळेकर,अरुण माधव, विलास सांडव, भिवा पारकर, , पुनेश जाधव हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत तर पंकज वर्दम, मधू कोकरे व रेश्मा पोईपकर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामुळे १३ पैकी १२ जागांवर विजय प्राप्त करून या संस्थेवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित केली आहे. निवडून आलेल्या या सर्व नवनिर्वाचित संचालकांमधून चेरमन, व्हा. चेअरमन निवडीचा कार्यक्रम नुकताच संस्था कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. ए. भोगले व सचिव व्ही. आर. परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महाविकास आघाडी पुरस्कृत गाव विकास पॅनेलचे प्रमुख गोपीनाथ पालव, पोईप गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्ताराम पालव, परशुराम नाईक, विजय पालव, अनिल येरम, सुनील भाटकर, बाळा सांडव, पांडुरंग चव्हाण, गिरीश पालव, शिवरामपंत पालव, नितीन पालव व संस्था कर्मचारी विद्याधर पोईपकर, सागर भाटकर व महा विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित चेरमन, व्हा. चेअरमन व संस्था संचालक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन श्री. विठ्ठल नाईक म्हणाले की शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना संस्थेच्या माध्यमातून राबवून आमच्यावर जनतेने टाकलेला विश्वास व जबाबदारी सार्थकी लावू असे प्रतिपादन विठ्ठल नाईक यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)