ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उन्हाळी सुट्टीतच पूर्ण करण्याची जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची 'एससीईआरटी'कडे मागणी.

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उन्हाळी सुट्टीतच पूर्ण करण्याची जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची 'एससीईआरटी'कडे मागणी.

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण उन्हाळी सुट्टीतच पूर्ण करण्याची जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची 'एससीईआरटी'कडे मागणी.

Article image

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांची माहिती.


मालवण | प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत काढलेल्या नवीन परिपत्रकात अंशतः बदल करून, ज्या शिक्षकांवर जनगणना किंवा बीएलओ (BLO) कामाची जबाबदारी नाही, अशा पात्र शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतच प्रशिक्षण पूर्ण करण्याची परवानगी द्यावी अशी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक आणि सिंधुदुर्ग 'डाएट'च्या प्राचार्यांना पाठवण्यात आले.

'एससीईआरटी'च्या २२ मे २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांपैकी केवळ शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाच २ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तर उर्वरित शिक्षकांचे प्रशिक्षण आगामी दिवाळी सुट्टीत घेण्याचे नियोजन असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांवर सध्या जनगणना अथवा बीएलओ संदर्भातील कोणतेही शासकीय काम सोपवण्यात आलेले नाही. तसेच काही शिक्षकांचे बीएलओ कामकाज २ जून पूर्वीच पूर्ण होणार आहे. अशा शिक्षकांना उन्हाळी सुट्टीच्या शिल्लक काळातच प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी दिल्यास, शासकीय कामात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. उलट यामुळे शिक्षकांची हक्काची दिवाळी सुट्टी वाचेल आणि पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या अध्यापन कामकाजावरही कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, असे अध्यापक संघाने पत्रात स्पष्ट केले आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, या जिल्ह्यातील संघटनेने शिक्षकांच्या या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे. वरीष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या आणि शासकीय निवडणूक / जनगणना कामाचे बंधन नसणाऱ्या शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना २ ते १२ जून या कालावधीतच प्रशिक्षण पूर्ण करण्याची विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर आणि राज्य फेडरेशन प्रतिनिधी अशोक गिते यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. या निर्णयामुळे प्रशासनाचे कामही वेळेत पूर्ण होऊन सर्वांसाठीच सोयीचे होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे अशी माहिती अजय शिंदे यांनी दिली आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 501
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स