ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी मासेमारी बंदी कालावधीबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी मासेमारी बंदी कालावधीबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी मासेमारी बंदी कालावधीबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न.

Article image


समिती सदस्य मेघनाद धुरी यांची महाराष्ट्रात बंदी कालावधी वाढवायचा असल्यास इतर राज्यांमध्येही तसेच नियम असणे आवश्यक असल्याची सूचना.

Article image

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे तसेच तज्ज्ञांचे पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढविण्याच्या विविध पैलूंवर अभिप्राय.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार देशाच्या पश्चिम सागरी किनारी सध्या १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) असा एकसमान पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू आहे. मात्र कोकण किनारपट्टीवरील पावसाळ्याचा कालावधी व समुद्रातील प्रतिकूल हवामान लक्षात घेता हा बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट एवढा वाढविण्याबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात बंदी कालावधीत वाढ करावयाची असल्यास गोवा व कर्नाटकसह पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी समान नियम असणे आवश्यक असल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.

Article image


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ तसेच सुधारित अध्यादेश २०२१ अंतर्गत गठीत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ काॅन्फरन्सींग द्वारे पार पडली. बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तसेच तज्ज्ञांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढविण्याच्या विविध पैलूंवर आपले अभिप्राय नोंदविले.


प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगे यांनी कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस उशिरापर्यंत कायम राहत असल्याने मासेमारी बंदी कालावधी ऑगस्ट अथवा सप्टेंबरपर्यंत वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली. मे महिन्याच्या अखेरीस समुद्रातील हवामान अचानक खराब होऊन जीवितहानीच्या घटनाही घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे २५ मे ते ३१ ऑगस्ट असा बंदी कालावधी ठेवण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Article image

सागरी सुरक्षा शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी राजेंद्र मकदुम यांनी महाराष्ट्र राज्यात स्वतंत्रपणे बंदी कालावधीत वाढ केल्यास गोवा व कर्नाटकातील मासेमारी नौकांकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे समुद्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी समान बंदी कालावधी लागू करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.


मत्स्य महाविद्यालय, शिरगाव - रत्नागिरी येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी मत्स्यसाठ्यात होत असलेली घट लक्षात घेता मासळीच्या पिल्लांची वाढ व मत्स्यसंपत्ती संवर्धनासाठी पावसाळी बंदी कालावधीत वाढ करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनीही पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी एकसमान बंदी कालावधी असावा, असे नमूद केले.


समिती सदस्य मेघनाद धुरी यांनी देखील महाराष्ट्रात बंदी कालावधी वाढवायचा असल्यास इतर राज्यांमध्येही तसेच नियम असणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्यथा बंदी कालावधीत इतर राज्यांतील नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत समान बंदी कालावधी लागू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच काही अशासकीय सदस्यांनी बंदी कालावधी सद्यस्थितीत आहे तसाच ठेवण्याची मागणी देखील केली. 


परंतु बहुतांश सदस्य यांनी बंदी कालावधीत वाढ करावयाची असल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात देखील त्याप्रमाणे एकसमान वाढ करण्यात यावी असे मत नोंदविले.  


श्री. विनायक प्रभू, श्री. अशोक सारंग, श्री. अनंत केळुसकर, श्री. रविकिरण तोरस्कर, श्री. वसंत तांडेल यांनी देखील ह्या बैठकीत आपली मते नोंदविली.

बैठकीत झालेल्या चर्चेतील सर्व मुद्दे व प्राप्त अभिप्राय राज्य सल्लागार सनियंत्रण समिती तसेच वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स