मालवणातील श्री देवी भैरवी मंदिर सभागृहाचे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
मालवणातील श्री देवी भैरवी मंदिर सभागृहाचे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातल्या सोमवार पेठेतील श्री देवी भैरवी मंदिराचा १७ वा वर्धापनदिन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सामाजिक एकोपा, परंपरा आणि समाजहिताची भावना जपत उभारण्यात आलेल्या श्री देवी भैरवी मंदिर सभागृहाचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नाभिक समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सभागृहाच्या उद्घाटनावेळी उद्योजक दत्ता सामंत यांनी नाभिक समाजाच्या प्रगतीचा विशेष उल्लेख केला. नाभिक समाज हा केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि संघर्षातून पुढे आलेला समाज आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत समाजातील युवक उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन करत त्यांनी समाजातील तरुणांना एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले. राजकीय भूमिकेबाबत भाष्य करताना श्री. दत्ता सामंत यांनी समाजाने केवळ मतदानापुरते मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले. समाजाची ताकद केवळ संख्येत नसून संघटित विचारांमध्ये असते. आपल्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी समाजाने ठाम भूमिका घेणे काळाची गरज आहे, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भैरवी मंदिर सभागृह हे भविष्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या सभागृहामुळे समाजातील कार्यक्रमांना नवे व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा गावकर, नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, नाभिक समाज तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, आनंद आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, उद्योजक मधुकर चव्हाण आणि मान्यवर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना कांता चव्हाण यांनी मंदिर उभारणीसंदर्भात आणि सभागृह बांधणीसाठी योगदान दिलेल्या सर्व नाभिक बांधवांच्या आणि समाजातील दानशूर मंडळींच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उदय चव्हाण, विजय चव्हाण, मिहीर चव्हाण, भूषण चव्हाण, अंकुश चव्हाण, लवू चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, देवेंद्र चव्हाण, चिन्मय चव्हाण, रोहन चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, आबली चव्हाण, तेजस चव्हाण, लिशा चव्हाण, राकेश चव्हाण, दिलीप वायंगणकर, आप्पा चिपकर, उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, जयेश कुबल तसेच नाभिक समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांनी महेनत घेतली होती. यावेळी सभागृह आणि श्री देवी भैरवी मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)