ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
गवंडीवाडा ते बाजारवाडा भागातील वीज समस्या मार्गी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गवंडीवाडा ते बाजारवाडा भागातील वीज समस्या मार्गी.

गवंडीवाडा ते बाजारवाडा भागातील वीज समस्या मार्गी. 

Article image

नगरसेवक मंदार ओरसकर यांचा पाठपुरावा. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात गवंडीवाडा ते बाजारवाडा या भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने हॉटेल कल्पतरू जवळील विद्युत रोहित्राची क्षमता वाढवली असून, हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


गेल्या अनेक महिन्यांपासून गवंडीवाडा ते बाजारवाडा परिसरात विजेचा दाब प्रचंड कमी असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. घरातील विजेवर चालणारी उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येकडे नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मंदार ओरसकर यांचे लक्ष वेधले. त्यानंतर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.


नगरसेवक मंदार ओरसकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या कामासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि हॉटेल कल्पतरू येथील विद्युत रोहित्राची क्षमता वाढवण्यास मंजुरी मिळाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून हे काम पूर्ण करण्यात आले.


परिसरातील विजेची समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. रोहित्र क्षमता वाढवल्यामुळे सध्यातरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात गवंडीवाडा भागात ज्या ज्या ठिकाणी अजूनही थ्री-फेज लाईन उपलब्ध नाही, तिथे नवीन थ्री-फेज लाईन टाकण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे आश्वासन नगरसेवक मंदार ओरसकर यांनी दिले.


यावेळी स्थानिक नागरिक नेल्सन रईस, बाबा मेंडीस, जेम्स फर्नांडिस, संदीप पेडणेकर आणि देवा तोडणकर यांचे सहकार्य लाभले. नगरसेवक मंदार ओरसकर यांच्यासह बाबा फर्नांडिस आणि बबन वाघ उपस्थित होते. भर उन्हात आणि तातडीने हे काम पूर्ण करणाऱ्या महावितरणच्या वायरमन व कर्मचाऱ्यांचे स्थानिक नागरिकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या समस्येतून सुटका झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 206

लोकप्रिय टॅग्स