ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात श्री देवी भैरवी मंदिराचा २० मे रोजी १७ वा वर्धापनदिन सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात श्री देवी भैरवी मंदिराचा २० मे रोजी १७ वा वर्धापनदिन सोहळा.

मालवणात श्री देवी भैरवी मंदिराचा २० मे रोजी १७ वा वर्धापनदिन सोहळा. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील सोमवार पेठ येथील श्री देवी भैरवी मंदिराचा १७ वा वर्धापनदिन सोहळा बुधवार, २० मे रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजेने होणार असून सकाळी ११ वाजता श्री देवी भैरवी सभामंडपाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सायंकाळी ६ वाजता 'स्वरसंध्या' संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री ८ वाजता श्री देवी भुमिकाई प्रसादिक भजन मंडळाचे भजन, रात्री १० वाजता श्री बोडेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, बांदामार्फत 'भवानी शंकर' हे पारंपारिक दशावतारी नाटक सादर होणार आहे.


या वर्धापनदिन सोहळ्याला भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विजय सिताराम चव्हाण यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स