ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
बिळवस हायस्कुल येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बिळवस हायस्कुल येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात.

बिळवस हायस्कुल येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात.

Article image

मसुरे | प्रतिनिधी : माध्यमिक विद्यालय बिळवस येथे आजी - माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

Article image


यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष व शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. सुर्यकांत जगन्नाथ पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. जयवंत ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळा व माजी विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधांची महती स्पष्ट केली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी कायम नाते जपून ठेवल्याबद्दल आभार मानून यापूढे शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.       


बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, शिस्त, परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर जीवनात यश मिळवता येते असे प्रतिपादन केले. 


यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुर्यकांत जगन्नाथ पालव यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी स्पीकिंग वर्ग व कॉम्प्युटर बेसिक कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच विषयतज्ञांमार्फत विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.


यावेळी हायस्कूलचे मुखाध्यापक श्री. ठाकूर यांच्यासह बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष ॲड. अमित पालव, उपाध्यक्ष सदाशिव नारायण पालव, कोषाध्यक्ष सुबोध पालव, आंगणेवाडी प्रमुख ग्रामस्थ सिताराम आंगणे, उद्योजक सुधिर साळसकर, माजी विद्यार्थी संतोष भोगले, बिळवस ग्रामसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष दाजी पालव, सरचिटणीस अशोक पालव, खजिनदार विश्वनाथ पालव, सदस्य अशोक पालव, चंद्रशेखर पालव, प्रभाकर पालव, शालेय समिती उपाध्यक्ष गोविंद सावंत, जयराम पालव, बिळवस पोलिस पाटील सौ. राधिका पालव, श्री देवी सातेरी देवालय ट्रस्ट बिळवसचे अध्यक्ष आनंद पालव व विविध मान्यवर उपस्थित होते. 


माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

इ. १० वी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना २०,०००/- शिष्यवृत्ती देण्याचे, शाळेचे अमेरिकास्थित माजी विद्यार्थी श्री. अरुण पालव यांनी जाहीर केले. 


यावेळी आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रथम मुख्याध्यापक व बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यांचा बिळवस ग्राम सेवा मंडळा मार्फत जीवन गौरव पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने आजी माजी विद्यार्थीं विद्यार्थिंनी व बिळवस पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. शिंदे यांनी केले तर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड. अमित पालव यांनी आभार प्रदर्शन केले तसेच मानून शाळेच्या पुढील प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स