ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या स्थलांतरासाठी शालेय शिक्षण विभागाचे नवे निकष.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या स्थलांतरासाठी शालेय शिक्षण विभागाचे नवे निकष.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या स्थलांतरासाठी शालेय शिक्षण विभागाचे नवे निकष.


ब्यूरो न्यूज : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या स्थलांतरासाठी शालेय शिक्षण विभागाने नवे निकष लागू केले आहेत. नव्या धोरणानुसार २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक आणि ४० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळांच्या स्थलांतर प्रस्तावांचा यापुढे विचार केला जाणार नाही अशी माहिती मिळत आहे. 


अपवादात्मक परिस्थितीतच शाळांना स्थलांतराची परवानगी दिली जाणार आहे. स्थलांतरासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर प्रमाणपत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना - हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आरटीईनुसार सर्व भौतिक सुविधा, तुलनात्मक छायाचित्रे आणि विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधार प्रमाणीकरण बंधनकारक असेल.


स्थलांतरासाठी अंतर मर्यादाही निश्चित केली आहे. इयत्ता १ ते ८ साठी ५ किमी, ९ ते १० साठी १० किमी आणि ११ ते १२ साठी २० किमीपर्यंतच स्थलांतराला परवानगी दिली जाईल अशी माहिती मिळत आहे. 


शाळा दुरुस्ती किंवा बांधकाम सुरू असल्यास मूळ शाळेपासून ३ किमीच्या आत दोन वर्षांसाठी तात्पुरत्या स्थलांतरास मंजुरी देण्याचे अधिकार विभागीय उपसंचालकांना देण्यात आले आहेत. शासनाने या धोरणामागे सुरक्षित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व अनियमित स्थलांतरांना आळा घालणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले असल्याचे समजते आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 543

लोकप्रिय टॅग्स