ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम.

प्रकाशन: 16 May 2026 10:02 AM
वाचन संख्या 337

मालवणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम. 

Article image

मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे सदस्य प्रसाद बागवे, युवा उद्योजक रोहन सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय कोळगे व मान्यवर उपस्थित.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात मानवता विकास परिषदच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. गुरुवार, १४ मे २०२६ रोजी लीलांजली सभागृह, मालवण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष, रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत श्री. पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्थेचे सचिव आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व उद्योजक प्रसाद बागवे, युवा उद्योजक रोहन सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय कोळगे व मान्यवर उपस्थित होते. 


छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी मानवता विकास परिषदच्या वतीने श्री. श्रीकांत सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवर उद्योजक रोहन सावंत व प्रसाद बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी प्रमुख वक्त्या ज्येष्ठ साहित्यिक आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मराठी मालिकेच्या संवाद लेखन सहकारी वैशाली पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातून देह, देश, धर्म आणि मानवता या घटकांचे मिळणारे संदेश यावर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याला त्यांनी केलेल्या विविध खडतर साधना, अभ्यास, संस्कार आणि कौटुंबिक जाणीवांची असलेली जोड याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी विशेष माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी योद्धे होते आणि सोबतच ते विद्वान, अभ्यासू आणि धर्मरक्षक राजे होते. त्यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही वैशाली पंडित यांनी नमूद केले.


यावेळी मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून भागोजीशेठ कीर यांनी १९३१ साली रत्नागिरी येथे उभारलेल्या पतित पावन मंदिराचा विशेष उल्लेख केला. त्याप्रमाणे कार्य करण्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी, असे आवाहन केले. समाजात जात, धर्म, पंथ या सर्व घटकांचं गांभीर्य, शिस्त व महत्व जाणून परस्परांचा आदर करत एकत्र येत मानवतेची भावना जपणे ही छत्रपती संभाजी महाराजांना खरी आदरांजली असे श्रीकांत सावंत यांनी सांगितले. कोकणातील युवकांमध्ये उच्च दर्जाची प्रतिभा असते आणि अशा प्रतिभावंतांना मातृभाषेतून पदवी शिक्षण प्राप्त झाले तर रोजगाराच्या संधी वाढतील, कौशल्य विकास होईल आणि यामुळे निर्भेळ स्पर्धात्मक वातावरण तयार होत प्रत्येकाच्या विचारात स्वराज्य निर्मिती व रक्षणाची ज्योत तेवत राहू शकेल असेही श्रीकांत सावंत यांनी सांगितले. 


यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह व्यावसायिक संतोष नागवेकर ॲड. एन. पी. मठकर, मालवणी बाजार उपाध्यक्ष मारुती सोनवडेकर, दत्तप्रसाद पेडणेकर, निवृत्त खाजगी सुरक्षा सल्लागार विश्वनाथ परांजपे, अविनाश परांजपे, श्री. वेंगुर्लेकर, तुषार हडकर, वेदांत वायंगणकर आदी उपस्थित होते. 


मानवता विकास परिषदच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेले ह मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उद्योजक महेश कांदळगावकर, सौ. स्मृती महेश कांदळगावकर, पर्यटन व्यावसायिक व हाॅटेल बांबूचे मालक संजय गावडे आणि लीलांजली सभागृह व्यवस्थापन आणि सागर लीलाधर हडकर परिवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


या कार्यक्रमात मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद सचिव दिलीप चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे संकल्पक श्रीकांत सावंत व सहकारी यांची प्रशंसा केली आणि समाधान व्यक्त केले.


सानिका जान्हवी जगदीश वायंगणकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स