मालवण तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.७६%.
मालवण तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९८.७६%.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९८.७६% लागला आहे. मालवण तालुक्यातील २८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मालवण तालुक्यातील एकूण ३५ शाळांमधून ९७४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३५७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तर ३६२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २०१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ४२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)