ताज्या बातम्या
श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २२ व्या वर्षी १००% निकाल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २२ व्या वर्षी १००% निकाल.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २२ व्या वर्षी १००% निकाल.

Article image


३९ विद्यार्थ्यांना 'डिस्टींक्शन...!'


मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. रोझरी इंग्लिश स्कूलच्या १००% निकालाचे हे सलग २२ वे वर्ष आहे.


यावर्षी, रोझरी इंग्लिश स्कूलचे सर्व ५० विद्यार्थी - विद्यार्थीनी १० वी च्या परीक्षा निकालात यशस्वी झाले असून त्यातल्या ३९ जणांना 'डिस्टींक्शन' मिळाले आहे. ९ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर २ जण द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.


रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. पार्थ बागवे याने ९७.४०% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाच्या कु. मधुरा परब हिला ९६.००% तर तृतीय क्रमांकासाठी कु. वंशिका रावले व कु. समर्थ यादव यांना प्रत्येकी ९५.८०% गुण प्राप्त झाले आहेत. 


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी - विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स