ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी श्री. नारायण उर्फ सुधा आंगणे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी श्री. नारायण उर्फ सुधा आंगणे.

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी श्री. नारायण उर्फ सुधा आंगणे.

Article image



मसुरे | प्रतिनिधी : भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड मुंबई दादर येथे जाहीर करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांची ही निवड करण्यात आली आहे.

   

नारायण उर्फ सुधा आंगणे गेली अनेक वर्ष कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे मुंबई येथे नेतृत्व करत आहेत. लार्सन अँड टुब्रो या कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले होते. सामाजिक, राजकीय तसेच कला व क्रीडा क्षेत्रामध्ये आंगणेवाडी सहित परिसरामध्ये त्यांचे योगदान आहे. 


यावेळी बोलताना सुधा आंगणे म्हणालेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे तसेच भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत आणि इतर सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून काम करताना सर्व कामगारांना योग्य ते सहकार्य आणि त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण तन मन धन अर्पण करून काम करणार आहे आणि आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या पदाला योग्य तो न्याय दिला जाईल.


सुधा आंगणे यांच्या या अभिनंदन निवडीबद्दल आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाळा आंगणे,

माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, आनन आंगणे, गजानन उर्फ बाबू आंगणे, सुनील आंगणे, सतीश आंगणे, बाब्या आंगणे, प्रसाद आंगणे, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मसुरे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 615

लोकप्रिय टॅग्स