ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक.


Article image

   

ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी, २४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची निवड करण्यात आली. पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन वैभव नाईक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने आणि एकदिलाने शिवसेना संघटनेचे काम करण्याचे आवाहन पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.  

     

यावेळी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून, सर्वांना सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदाच्या शुभेच्छा दिल्या. 

      

याप्रसंगी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, उपनेत्या जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, रुपेश राऊळ, संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कृष्णा धुरी, सचिन कदम, प्रथमेश सावंत, जयेश नर, नंदू शिंदे, चंद्रकांत कासार, गणेश गावकर, उत्तम लोके, रवींद्र जोगल, बाळा कोरगावकर, अनुप नाईक, संकेत नाईक, जयेश धुमाळे, योगेश धुरी, मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, संजय गवस, माजी नगरसेवक नितीन वाळके, राजू राठोड, नगरसेवक तपस्वी मयेकर, बाळा गावडे, अवधूत मालणकर, दिनेश चमणकर, वैदेही गुडेकर, सुशील चिंदरकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, रुपेश आमडोस्कर, अमर घाडी, अमोल वस्त, स्वप्नील आचरेकर, सुहास गावडे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 201

लोकप्रिय टॅग्स