ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचा स्नेहमेळावा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचा स्नेहमेळावा संपन्न.

एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचा स्नेहमेळावा संपन्न. 

Article image

Article image


कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. एस. पी. एम इंजिनिअरिंग कॉलेजचा २०२६ चा 'उत्तुंग' स्नेहमेळावा संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे चे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे, संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी 'उत्तुंग' या स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले त्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी, त्यांचे वडिल खासदार नारायण राणे, आई नीलम राणे आणि गुरुजन वर्गामुळे ही संस्था यशस्वी होऊन पुढे वाटचाल करत आहे. चांगली संस्था उभी करण्यासाठी चिकाटी, कष्ट आणि प्रामाणिक मन त्यांच्या आईवडिलांचे आहे म्हणून ही संस्था प्रामुख्याने पुढे जाते. अनेक विषय मोठ्या युनिव्हर्सिटीत राबविले जातात ते आपल्या संस्थेत राबवले जात आहेत, त्याबद्दल अभिनंदन केले तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्याचेही सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स