ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांची राज्यस्तरीय परीक्षेत व्याक'रण झुंजार' कामगिरी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांची राज्यस्तरीय परीक्षेत व्याक'रण झुंजार' कामगिरी...!

भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांची राज्यस्तरीय परीक्षेत व्याक'रण झुंजार' कामगिरी...!

Article image


स्वानंद परब राज्यात प्रथम तर मनस्वी झुंजार पेडणेकर राज्यात द्वितीय. 


मसुरे | प्रतिनिधी : भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे, मर्डे या प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या, महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ मुंबई आयोजित राज्यस्तरीय इंग्लिश ग्रामर परीक्षा २०२५ - २०२६ मध्ये भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे, मर्डे प्रशालेचा विद्यार्थी कुमार स्वानंद विश्वनाथ परब ह्याने 'ब' गटामध्ये इयत्ता तिसरी व चौथी या गटातून १०० पैकी ९७ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याच प्रशालेची विद्यार्थिनी मनस्वी झुंजार पेडणेकर हिला इयत्ता चौथी 'ब' गटामध्ये ९६ गुण मिळाले असून ती राज्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. 


प्रशालेचे एकूण ७२ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण निकाल हा ९३% लागला आहे. 


विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब, उपाध्यक्ष संजय परब, स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभू गावकर, डॉ अनिरुद्ध मेहंदळे, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, संस्था सचिव अशोक मसुरेकर मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, मसुरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून सिस्टर कांता, स्टेला लोबो,  रसिका मेस्त्री, स्वरांजली ठाकूर, यांचे मार्गदर्शन लाभले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स