ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात 'सैय्यारा फेम' साधना तावडे यांची 'बीट बाॅक्सिंग कार्यशाळा' उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात 'सैय्यारा फेम' साधना तावडे यांची 'बीट बाॅक्सिंग कार्यशाळा' उत्साहात.

मालवणात 'सैय्यारा फेम' साधना तावडे यांची 'बीट बाॅक्सिंग कार्यशाळा' उत्साहात. 

Article image

Article image


बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम. 

Article image


नोरा फतेही सोबत मिंत्राच्या जाहिरातीतील सहभागी साधना तावडे यांनी कार्यशाळेतील  'विद्यार्थी ते ज्येष्ठ' सहभागींची केली विशेष प्रशंसा.

Article image


मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १५ एप्रिल २०२६ रोजी सुप्रसिद्ध बीट बाॅक्सिंग कलावंत तथा सैय्यारा फेम साधना तावडे यांची बीटबाॅक्सिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध नामवंत बीटबाॅक्सर साधना तावडे, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सुमेधा नाईक, साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

Article image


सुरुवातीला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प व पुस्तक भेट स्वरूपात देऊन स्वागत केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी, साधना तावडे यांचा परिचय करून दिला. साधना तावडे ह्या स्वशिक्षित बीटबाॅक्सिंग कलाकार असून त्यांनी हिप हाॅप, फॅन जॅम मध्ये सादरीकरण केले आहे. नोरा फतेही सोबत मिंत्राच्या जाहिरातीत त्या झळकल्या आहेत. मोहित सुरी यांच्या २०२५ च्या 'सैयारा' हिंदी चित्रपटात देखील त्यांचा समावेश आहे असे श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी विशेष अधोरेखित केले.


साधना तावडे यांनी उपस्थित सर्वांचा परिचय करून घेतला. त्यांनी त्यांचा बीटबाॅक्सिंगचा आजवरचा प्रवास थोडक्यात कथन केला. बीटबाॅक्सिंग म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्वांना सहभागी करून घेत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले आणि थेट सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. 

Article image


Article image

कार्यशाळे दरम्यान साधना तावडे यांनी प्रशंसापूर्वक सांगितले की, मालवण शहरात विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचा सहभाग करून घेण्यासाठी त्या यशस्वी झाल्या आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मालवणात मिळाला आहे. झाडाला खत - पाणी घातल्यावर, त्यांना जपल्यावर फळं येतात त्याचप्रमाणे आपल्या करिअरवर आपण प्रेम केलं, सराव आणि सातत्य ठेवलं तर संधी चालून येतात. कोणतीही गोष्ट करताना स्वतःच स्वतः वर टीका न करता आपल्या कलेवर आपला विश्वास पाहिजे, असेही साधना तावडे यांनी सांगितले. तसेच युट्युब आणि इन्स्टाग्राम या ॲप्सचा योग्य कामांसाठी 'साधन' म्हणून वापर करावा. येणाऱ्या संधींचा आपण फायदा करून घ्यावा, असंही साधना तावडे यांनी सांगितले.


Article image

डॉ. सुमेधा नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, साधना तावडे यांनी २०१७ सालापासून हे करिअर निवडले. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खडतर आहे. मुंबईतील पहिल्या महिला बीटबाॅक्सर म्हणून साधना तावडे परिचित आहेत.

बीटबाॅक्सिंग हासुद्धा एका संस्कृतीचा भाग आहे आणि सेवांगण सारखे व्यासपीठ या कार्यशाळेसाठी लाभले त्याबद्दल डॉ. सुमेधा नाईक यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांचे आभार मानले. तसेच इथे उपस्थित असलेल्यांपैकी प्रत्येकजण करिअर सोबत छंद म्हणून ही कला जोपासतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी उपस्थितांशी विविध प्रश्नोत्तरांतून कार्यशाळेला संवादात्मक स्वरूप दिले आणि बीटबाॅक्सिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, साने गुरुजी वाचन मंदिर प्रमुख ग्रंथपाल ऋतुजा केळकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, उद्योजक सुहास ओरसकर, सांस्कृतिक जाणकार व उद्योजक उमेश सांगोडकर, रिया दळवी, वैशाली शंकरदास, सारिका शिंदे, संजय वराडकर, श्री. वेंगुर्लेकर तसेच टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी उपस्थित होते. 


उपस्थितांनी बीटबाॅक्सिंग ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली असून अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे कलागुणांना वाव मिळतो, असे मत व्यक्त केले. तसेच बीटबाॅक्सिंग संदर्भातील कोर्स उपलब्ध व्हावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 


Article image

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सूत्रसंचालन केले. साने गुरूजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स