ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्म रॅली संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्म रॅली संपन्न.

मालवणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्म रॅली संपन्न. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणात फुले शाहू आंबेडकर विचारमंच या संघटनेतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी समाजमंदिर मालवण येथून समाजमंदिर एस. टी. स्टॅंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा अशी भव्य धम्मरॅली काढण्यात आली.


धम्मरॅलीनंतर मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. बाबासाहेब नदाफ, प्रमुख पाहुणे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे यांच्यासह नाटककार, लेखक डॉ. श्रीकांत धारपवार, माजी गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, नगरसेवक व मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शुभांगी पवार, प्रा. नागेश कदम, सेवानिवृत्त नायब तहसीलदार व विचारमंचचे सचिव आनंद मालवणकर, महिला विभाग अध्यक्षा सौ. माधुरी जाधव आदी उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शरीराची, कुटुंबाची पर्वा न करता बहुजन समाजाला प्रकाशात आणण्याचे काम केले. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार संघर्ष करायला व ज्ञान मिळवायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवादल कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बाबासाहेब नदाफ यांनी केले.


यावेळी प्रा. राबते, डॉ. धारपवार, पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांनीही विचार मांडले. सिद्धार्थ जाधव व पूनम चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य समाज मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात रंजन तांबे यांनी फुले शाहू आंबेडकर विचारमंचात तरुणांनी या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन डी. डी. जाधव यांनी केले तर आभार गुळवे यांनी मानले.


यानंतर दुसऱ्या सत्रात लोकशाहीर सदाशिव निकम कोल्हापूर यांचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी जलसा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स