ताज्या बातम्या
ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन.
मालवणात शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांना विमा संरक्षण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांना विमा संरक्षण.

मालवणात शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांना विमा संरक्षण.

Article image


Article image

Article image


खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य.


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह नगराध्यक्षा ममता वराडकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांची उपस्थिती. 


मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेना यांच्या वतीने, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांचा २ लाखाचा विमा उतरविण्यात आला. यावेळी मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना जिल्हा संघटक व स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, तालुकाप्रमुख मंदार लुडबे व विनायक बाईत, माजी नगरसेवक जाॅन नर्होन्हा, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, शानु वालावलकर, नगरसेविका नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर सावंत, पदाधिकारी राजा गावकर, विश्वास गांवकर, बाळू नाटेकर, भाऊ मोर्जे, वसंत गावकर, वरची देवली सरपंच श्याम वाक्कर, उद्योजक परशुराम पाटकर, सूर्या फणसेकर, गुरू मणचेकर तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालका साठी २ लाखाचा विमा उतरविला गेला आहे. यात नांव नोंदणी केलेल्या पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे असे विशेष आवाहन करण्यात आले होते.


६० वर्षाच्या आतील विमाधारकाला अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची १०० टक्के रक्कम, अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची १०० टक्के रक्कम विमा धारकास मिळणार आहे असे या विम्याचे स्वरूप आहे अशी माहिती मिळत आहे.



यावेळी रिक्षा चालक निलेश लुडबे, संकेत राऊळ, राजा मांजरेकर, विठू वराडकर, पंकज मसूरकर यांच्यासह असंख्य रिक्षा चालक बांधव उपस्थित होते. 


लाभार्थी रिक्षा चालकांच्या वतीने निलेश लुडबे यांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेचे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी वर्गाचे आभार मानले. उपस्थित व विमा लाभार्थी रिक्षा चालकांच्या वतीने खासदार नारायणराव राणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर महिन्याच्या १० तारखेला विविध उपक्रम आयोजीत करत साजरे करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स