ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.

जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ.

Article image

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या जबाबदार भूमिकेबाबत मार्गदर्शन. 


सिंधुर्दुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक ०६ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व फिल्ड ट्रेनर यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी फिल्ड ट्रेनर यांना दिल्या. 

Article image

                

यावेळी मच्छिंद्र सुकटे (निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी), श्रीम. प्रतिभा वराळे (उप जिल्हाधिकारी), सामान्य प्रशासन) तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी श्रीम. आरती देसाई ( उपजिल्हाधिकारी)इमारत व दळणवळण तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी व श्रीम. चैत्याली सावंत तहसीलदार महसूल तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी यांची उपस्थिती होती.

           

ही जनगणना २०२६ - २७ मध्ये होणार असून दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना व घरगणना पूर्ण होणार आहे. या मध्ये दि.१ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना व दिनांक १६ मे २०२६ ते १४ जुन २०२६ घरगणना होणार आहे. यानंतर फेब्रुवारी २०२७ पासून दुसरा टप्पा कार्यवाही सुरु होणार असून यामध्ये लोकसंख्या गणना होण्याचे नियोजित आहेत.

           

आयोजित प्रशिक्षण शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये जनगणना २०२७ प्रक्रियेतील टप्पा एक नुसार घरगणना व घरयादी तसेच स्वगणना याबाबत सविस्तर मार्गदर्शन, मोबाईल अ‍ॅपचा वापर, तसेच माहिती संकलनाची पद्धत याबाबत श्री. अरुण साळगावकर, सांखिकी अन्वेषक तथा मास्टर ट्रेनर व श्री. सचिन पाटील, तहसीलदार कुडाळ तथा मास्टर ट्रेनर यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

         

या प्रशिक्षणासाठी मच्छिंद्र सुकटे (निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी) यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.  


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 531

लोकप्रिय टॅग्स