रुचा इंजिनिअर्स प्रा. लि. ला जपानकडून उत्पादन क्षेत्रातील प्रतिष्ठेचे टि. पी. एम. एक्सलन्स ॲवाॅर्ड प्रदान.
रुचा इंजिनिअर्स प्रा. लि. ला जपानकडून उत्पादन क्षेत्रातील प्रतिष्ठेचे टि. पी. एम. एक्सलन्स ॲवाॅर्ड प्रदान.
एकाच वेळी कंपनीच्या सहा विविध प्लांटसची उल्लेखनीय कामगिरी.
कंपनीचे अध्यक्ष उमेश दशरथी यांनी सर्व सहकारी, ग्राहक आणि हितचिंतकांचे मानले आभार.
ब्यूरो न्यूज : रुचा इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जपान इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट मेंटेनन्स (JIPM), जपान या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेकडून 'TPM Excellence Award' प्रदान करण्यात आला आहे.
प्लांट मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल एक्सलन्स क्षेत्रात 'JIPM' ही संस्था जगभरात अत्यंत मानाची मानली जाते. उत्पादन क्षेत्रामध्ये TPM Awards हे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात.
सन २०२५ मध्ये जगभरातील एकूण २७ कंपन्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून, त्यामध्ये रुचा इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे इतर बहुतांश कंपन्यांना त्यांच्या एका प्लांटसाठी हा पुरस्कार मिळाला असताना, रुचा इंजिनिअर्स कंपनीला एकाच वेळी सहा प्लांटसाठी TPM Excellence Award प्राप्त झाला आहे.
TPM Excellence Award हा जागतिक दर्जाची उत्पादन संस्था (World-Class Manufacturing Organization) बनण्याच्या प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कंपनीने आपली व्यवस्थापन प्रणाली, उत्पादन प्रक्रिया आणि कार्यसंस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कंपनीचे अध्यक्ष उमेश दशरथी यांनी या यशाबद्दल सर्व सहकारी, ग्राहक आणि हितचिंतकांचे आभार मानले असून, भविष्यातही कंपनी प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्या चिंतन शिबीरात महासंघ अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे मार्गदर्शनपर संबोधन.
पनवेल येथील अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाच्...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...