चिंदर येथे लक्ष्य करीअर अकॅडेमीचा उद्घाटन सोहळा संपन्न
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर येथे काल लक्ष्य करिअर अकॅडेमीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस भरतीचा मार्ग सोपा व्हावा या दृष्टीने आचरा पंचक्रोशीतील मुलांना प्राधान्याने मैदानी लेखी परीक्षेव्दारे सरावाचा व मार्गदर्शनाचा प्रयत्न करणार असल्यांचे संचालक श्री.अभय पाडावे यांनी सांगितले.
यावेळी गावठणवाडी उन्नती मंडळाचे अध्यक्ष-रावजी तावडे, पोलिस पाटील- दिनेश पाताडे, विठ्ठल रखुमाई देवस्थान अध्यक्ष गुरुदास पाडावे, ग्रा.प.सदस्य निलेश रेवडेकर, आनंद पाडावे, भाई चिंदरकर, उमेदवार, पालकवर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)