छत्रपती शिवरायांना स्विमिंग गृपच्या वतीने अभिवादन.
छत्रपती शिवरायांना स्विमिंग गृपच्या वतीने अभिवादन.
श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट चेअरमन तथा स्विमिंग गृप संस्थापक नगरसेवक श्री. महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व मान्यवर उपस्थित.
अक्कलकोट | ब्यूरो न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्यचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द आजही आपल्या बांधवांना प्रेरित करते म्हणून छत्रपती शिवरायांचे शौर्य येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे मनोगत अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमिंग गृपचे संस्थापक महेश इंगळे यांचे सुपुत्र तथा युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट स्विमिंग गृपच्या वतीने ग्रुपचे संस्थापक तथा श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते.
प्रथमेश इंगळे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले व प्रत्येकाने महाराजांची जयंती साजरी करावी तसेच आजच्या एकविसाव्या शतकातील तरुणाईने महाराजांच्या आदर्श विचारसारणीचे मापदंड व त्यांच्या यशोगाथेची महती आत्मसात करून, शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा असे मनोगत व्यक्त केले आणि महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी स्विमिंग गृपचे सदस्य अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त, स्विमींग गृपच्या व श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अमर पाटील यांचा श्री.स्वामी समर्थांचं कृपावस्त्र, प्रसाद, देवून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्विमींग गृपचे सदस्य संतोष पराणे, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, बाबा सुरवसे, अमर पाटील, अशोक कलशेट्टी, विश्वनाथ देवरमनी, कुमार हतुरे, सुरेश पाटील, शिवशरण अचलेर सर, सुरेश वाले सर, सुनिल पवार, स्वप्निल गायकवाड, डॉ.हिरण्णा पाटील, चंद्रकांत सोनटक्के, रमेश शिंदे, युवराज सोनटक्के, तन्मय इचगे, दर्शन घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, मल्लिनाथ माळी, अरविंद पाटील, शैलेश राठोर, अमर पाटील, श्रीकांत झिपरे आदींसह समस्त स्विमिंग ग्रुपचे सदस्य व शिवभक्त उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...