ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी 'शाळा बचाव' आंदोलन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी 'शाळा बचाव' आंदोलन.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी 'शाळा बचाव' आंदोलन. 

Article image

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : गावागावातील अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये बंद पडत चालल्याचा आरोप करत, या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'शाळा बचाव' आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाअंतर्गत सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मुख्य हायवे येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.


या मोर्चामध्ये ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पटसंख्येच्या कारणावरून अनुदानित शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असून, त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, गावातील शाळा बंद करणारे जाचक शासन निर्णय रद्द करावेत किंवा त्यामध्ये सकारात्मक बदल करावेत, जेणेकरून शिक्षणाचे विकेंद्रीकरण अबाधित राहील, खेड्यांतून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि मुलींचे शिक्षण खंडित होणार नाही.


"शाळा वाचल्या तर शिक्षण वाचेल" हा संदेश देत, गरीब, कष्टकरी, शेतकरी व बहुजन समाजाच्या शिक्षणाचा मार्ग बंद होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील जनतेने एकजुटीने उठाव केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


या आंदोलनात सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेऊन, आपण ज्या शाळांमध्ये शिकलो त्या शाळा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


या आंदोलनाची माहिती शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर, सचिव श्री. महेश पाटोळे तसेच समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली असून, जिल्ह्यातील जनतेने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स