टोपीवाला हायस्कूलचा २९ डिसेंबर रोजी ताम्रपट वितरण कार्यक्रम.
टोपीवाला हायस्कूलचा २९ डिसेंबर रोजी ताम्रपट वितरण कार्यक्रम.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, मालवण यांच्यावतीने संपन्न होणाऱ्या टोपीवाला हायस्कूलच्या ख्यातनाम माजी विद्यार्थ्याला स्व. डॉ. एस. एस. आजगांवकर ताम्रपट वितरणाचा व हायस्कूलच्या दोन कर्तबगार माजी विद्यार्थ्यांना स्व. डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम सोमवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता प्रशालेच्या रंगमंचावर होणार आहे.
यंदा, डॉ. प्रसाद जनार्दन वायंगणकर ताम्रपटाचे मानकरी ठरले आहेत. श्री. प्रशांत रवींद्रनाथ खोबरेकर व इरावती किशोर पटवर्धन यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मालवण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सुदेश बलवंत मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रशालेच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...
सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू : वैशाली पंडित