ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
१५ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

१५ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात.

१५ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात.

Article image


जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या स्पर्धकांना शुभेच्छा.


मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत, १३ डिसेंबर रोजी पहिला दिवस उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाण्याच्या अश्विन कुमार तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगले यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. मुलांच्या गटात ठाणेच्या तनय लाड व मुलींच्या गटात बेंगलोर येथील पी. वेणाश्री यांना उपविजेता चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पहिल्या दिवशी विविध गटात मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. राज्य सचिव राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनात आणि सुरक्षेच्या सर्व निकषात उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भव्य आयोजनात पहिल्या दिवशी स्पर्धा संपन्न झाली.


स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी डॉ. तपन पानेगिरी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, डॉ. राहुल पंतवालावलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कृष्णा ढोलम, महेश कदम, राधिका परब, ज्योत्स्ना परब, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, निल लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ यांसह आयोजक व मान्यवर उपस्थित होते.


अध्यक्ष दिपक परब यांनी सर्व सहभागी खेळाडूंना व सर्व पालक व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. सहभागी स्पर्धकांमुळे ही स्पर्धा यशस्वी होत असल्याचे सांगत ते म्हणाले, स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावर अधिक गुण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते. याचा विचार करून अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Article image

आठ राज्यांमधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्हे यातील सुमारे १५०० स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे १० किलोमीटर स्पर्धा व १ किलोमीटर, २ किलोमीटर फिन्स स्विमिंग स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होऊन मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येत आले. तसेच गृपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू आहेत.


२ किलोमीटर फिन्स मुले- रणबीरसिंग गौर (नागपूर), आलोक जाधव (नाशिक), अथर्व भेडे (नागपूर), अक्षत सावंत (ठाणे), बाळकृष्ण येरम (मुंबई), स्मित सावला (नाशिक), सुहास काळे (नाशिक), श्रेयस पराडकर (रायगड), केतन कुलकर्णी (पुणे), आकाश कोटिया (गुजरात) २ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे - जान्हवी धामी (मुंबई), स्वराली वानखेडे (नाशिक), निधी बोरीकर (नागपूर), अरुंधती सोनाव (पुणे), समीक्षा वेरुळे (बीड), राजनंदिनी चाटे (बीड), राजेश्वरी गायकवाड (पुणे), शर्वरी हजारे (पुणे), पायल मोरे (नाशिक), वैदेही पोतदार (मुंबई) १ किलोमीटर फिन्स मुले अनुक्रमे - ध्रुव धामणे (नाशिक), रुद्र मोरे (मुंबई), अरहान खान (नागपूर), श्रीदत्त पुजारी (बेळगाव), श्रीनिक भामबेरे (पुणे), परम वाघ (नाशिक), हर्षद जाधव (नाशिक), विराज पोमन (नाशिक), शिवंश पाटील (नाशिक), अर्जुन वाबळे (नाशिक) १ किलोमीटर फिन्स मुली अनुक्रमे- अकिरा खोत (पालघर), वसुंधरा कसबे (नाशिक), मनस्वी सोनावणे (पुणे), साची बंदाबे (पुणे), प्राजक्ता सुर्वे (मुंबई), सायली घुग्रेतकर (बेळगाव), अद्या म्हात्रे (ठाणे), अनुभा सोरटे (नागपूर), संहिता करमरकर (सातारा), श्रावणी कुलकर्णी (पुणे) १० किलोमीटर मुले अनुक्रमे - अश्विन कुमार (ठाणे), चैतन्य शिंदे (पुणे), वरद कुवर (नाशिक), रुद्र मानडे कोल्हापूर), सागर कांबळे (पुणे), अनुज उगले (नाशिक), भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), पुष्कर शेळके (नाशिक), साईश मालवणकर (ठाणे), विश्वा शिंदीकर (नाशिक), १० किलोमीटर मुली अनुक्रमे अनुजा उगले (नाशिक), मिहिका कोळंबेकर (मुंबई), स्वरा सावंत (ठाणे), चित्रानी नवले (सातारा), सुरभी शिंदे (मुंबई) 


१० किलोमीटर गट दुसरा मुले अनुक्रमे तनय लाड (ठाणे), श्लोक कोकणे (ठाणे), अबीर मांडवकर (ठाणे), प्रतुल्य झगडे (ठाणे), अबीर साळसकर (ठाणे), आरव आहुजा (ठाणे), निर्भय भारती (ठाणे), देव रजपूत (नंदुरबार), मयांक म्हात्रे (रायगड), दर्श बिलोरिया (ठाणे) मुली अनुक्रमे - पी वेण्याश्री (बेंगलोर), रेवा परब (ठाणे), हर्षदा चौधरी (ठाणे), गीतिशा भंडारे (ठाणे), प्रिशा वर्मा (ठाणे), अथश्री भोसले (ठाणे), विधी भोर (ठाणे), श्री शेट्टी (ठाणे), सई मुंडे (पुणे), स्पृहा उशिकर (ठाणे)


कनिष्ठ गट १ किलोमीटर मुली अनुक्रमे आर्या हिरवे, समीप्ता वाव्हल, अस्मि चौधरी, मुलगे- रेयांश खामकर, राजवीर फरांदे, सिद्ध मुप्पीनेस्ती, मुली-विहा चौहान, साजिरी पाटील, मास्टर वो पुरुष- प्रदीप नासकर, आशिष रंजन, अक्षय पवार, २ किलोमीटर पुरुष- विरमनी मनोहरन, ज्ञानेश वानडे, खंतील दीक्षित, पुरुष- प्रसाद काजबजे, सुदेश पत्की, १ किलोमीटर पुरुष- शिरीष पत्की कनिष्ठ गट २ किलोमीटर मुली- मेधस्वी परात्ने, मुलगे- उदित मलिक, लेना प्रनेश, मुलगे- रणबीरसिंग गौर, ध्रुव धामणे, निल पत्की, मुली- ओवी पवार, मुलगे- सुयश हिंदळेकर, सूर्या मंडल, त्रिग्या मुन, मुली- अस्मि हिरवे, शफझा शाहिद, ऐशी चक्रवर्ती, १ किलोमीटर मुलगे- बाळकृष्ण येरम, आरव भारद्वाज, शिवंश पाटील या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स