ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन.

ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन.


Article image



वेंगुर्ला | ब्यूरो न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक तथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या वेंगुर्ला अध्यक्षा वृंदा कांबळी यांच्या हस्ते, वेंगुर्ले नगरवाचनालय येथे 'वाचनवाट ग्रंथदालन' तर्फे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शन व विक्री असे या प्रदर्शनाचे स्वरूप होते. यावेळी संबोधित करताना ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी म्हणाल्या की, वाढत्या सोशल मिडियाच्या युगात एककिडे वाचन संस्कृती कमी होत असतानाच पुस्तक प्रदर्शनासारखे उपक्रम वाचन संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. वाचनातून वाचकाला ज्ञानज्योत मिळते. वाचन माणसाला समृद्ध करते. पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून विविधांगी पुस्तकांच्या खजिन्यांची चावी दिली आहे, वाचकांनी याचा फायदा करून घ्यावा असेही आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या वेंगुर्ला अध्यक्षा वृंदा कांबळी यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

   

या प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर,साहित्यप्रेमी माधवी मातोंडकर,नगर वाचनालय संस्थेच्या पूजा धावडे, जेनी डिसोजा, पत्रकार महेंद्र मातोंडकर, प्रथमेश गुरव, वाचनवाट ग्रंथदालनाचे मुग्धा मणेरीकर आणि सचिन मणेरीकर आदी उपस्थित होते. 

  

हे प्रदर्शन १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात मराठी दर्जेदार पुस्तके,लहान मुलांसाठी आकर्षक सचित्र पुस्तके, व्यवसायमाला,भाषिक खेळ, शब्दकोडी मांडण्यात आली आहेत. आवडीची पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळा महाविद्यालय तसेच वाचनालय यांना सवलत योजनाही ठेवण्यात आली आहे. वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मुग्धा मणेरीकर यांनी केले. 


मुग्धा मणेरीकर यांनी स्वागत केले तर सचिन मणेरीकर यांनी आभार प्रदर्शन केले.


सौजन्य | संजय पिळणकर ( वेंगुर्ले प्रतिनिधी)


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स