ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाकडे ‘आविष्कार २०२४-२५’ चे विभागीय सर्वंकष जेतेपद.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाकडे ‘आविष्कार २०२४-२५’ चे विभागीय सर्वंकष जेतेपद.

प्रकाशन: 04 Dec 2025 12:00 AM
वाचन संख्या 381

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाकडे ‘आविष्कार २०२४-२५’ चे विभागीय सर्वंकष जेतेपद. 

Article image


मालवण : मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा २०२४-२५ मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला (विभाग क्र. ९) विभागीय पातळीवरील सर्वंकष विजेतेपद प्राप्त झाले. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने, 'आविष्कार समन्वयक' प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी जेतेपदाचा पुरस्कार स्वीकारला.


यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. रवींद्र कुलकर्णी व प्र - कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या हस्ते २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन्ही शैक्षणिक वर्षांतील आविष्कार स्पर्धेतील झोनल, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.


मुंबई विद्यापीठाच्या 'डिपार्टमेंट ऑफ स्टुडंट डेवलपमेंट' विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, ओएसडी डॉ. मीनाक्षी गुरव, मार्गदर्शक प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. शशिकुमार मेनन व डॉ. मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हजारो विद्यार्थी अभिनव संशोधन प्रकल्प सादर करतात. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झोन क्र. ९ मधून २०२४-२५ या वर्षात तीन महाविद्यालयांनी विभागीय सर्वंकष जेतेपद मिळवली असून त्यात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (मालवण), संत राऊळ महाराज कॉलेज (कुडाळ) आणि आनंदीबाई रावराणे कॉलेज (वैभववाडी) यांचा समावेश आहे.


प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी हे यश म्हणजे विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग, मार्गदर्शक प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आविष्कार समितीतील सहकाऱ्यांचे सहकार्य, जिल्हा समन्वयक डॉ. सिरसट व सहसमन्वयक डॉ. उमेश पवार यांचे प्रयत्न, तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिवराम ठाकूर आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे पाठबळ याची यशस्वी परिणीती असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 


महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी या यशाबाबत सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स