ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
अपक्ष उमेदवार सौ. उमा अनिरुद्ध आठवले यांचा प्रचाराचा शुभारंभ.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अपक्ष उमेदवार सौ. उमा अनिरुद्ध आठवले यांचा प्रचाराचा शुभारंभ.

प्रकाशन: 19 Nov 2025 09:39 PM
वाचन संख्या 513

अपक्ष उमेदवार सौ. उमा अनिरुद्ध आठवले यांचा प्रचाराचा शुभारंभ. 

Article image


श्री गणेशाचे दर्शन घेऊन मतदारांशी साधलेल्या संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद.


प्रभाग '६ ब' मध्ये महिलांकडून तसेच युवकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रचाराला गती.


अलिबाग | ब्यूरो न्यूज : नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक '६ ब' मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सौ. उमा अनिरुद्ध आठवले यांनी श्री गणेशाचे दर्शन घेत प्रचाराला प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी मतदारांशी संवाद साधताना त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला.


सौ. आठवले यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी घराघरात भेटी सुरू केल्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम या मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. अपक्ष म्हणून कोणत्याही राजकीय दबावापासून दूर राहून केवळ प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रभागातील महिलांकडून तसेच युवकांकडून त्यांना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला चांगली गती मिळत आहे. स्थानिक पातळीवर त्यांच्या साधेपणामुळे आणि नागरिकांशी जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होत असल्याचे मतदार व्यक्त करत आहेत.


सौ. उमा आठवले यांच्या अपक्ष उमेदवारीला मिळणारा वाढता पाठिंबा प्रभाग '६ ब' मध्ये चर्चेचा प्रमुख विषय बनला आहे, अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स