आजीच्या शैक्षणिक तळमळीला न्याय देण्याचा प्रयत्न..!
आजीच्या शैक्षणिक तळमळीला न्याय देण्याचा प्रयत्न..!
मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन यांचे सि. ए परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रातून प्रथम क्रमांकाच्या यशानंतर भावपूर्ण उद्गार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे सुपुत्र आसिम सादिक मेमन यांनी सि. ए. च्या परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रात प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. आसीम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादीक दादापे मेमन यांचे चिरंजीव तर मसूद दादापे मेमन यांचे पुतणे आहेत. २३ वर्षीय आसीम मेमन यांच्या या यशाबद्दल त्यांची विशेष प्रशंसा होत असून त्यांच्या आजी खैरुन्नीसा मेमन, वडिल सादीक मेमन, आई रुख़साना मेमन आणि काका व मालवणचे ज्येष्ठ व्यापारी मसूद दादापे मेमन, काकू शहनाझ मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजेच आय सी ए आय तर्फे घेण्यात आलेल्या सि ए परीक्षेत कोल्हापूर केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आसिम सादिक मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित निकाल जाहीर झाले आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना आसिम सादिक मेमन यांनी त्यांच्या आजी व मालवणच्या ज्येष्ठ नागरीक खैरुन्नीसा मेमन यांच्या शैक्षणिक जाणिवांना न्याय द्यायचा प्रयत्न असतो असे सांगितले असून त्यांनी त्यांचे वडिल सादिक मेमन, काका मसूद मेमन आणि टोपीवाला हायस्कूलचे सर्व शिक्षक मान्यवर, विवेकानंद महाविद्यालय येथील कोल्हापूर येथील प्राध्यापक तसेच सर्व मार्गदर्शक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...