ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा. 


कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक मान्यवरांच्या विशेष शुभेच्छा.


मालवण | ब्यूरो न्यूज : प्लास्टिकपासून बनविलेल्या आकाश कंदीलला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात आली. यामध्ये मुलांनी जुन्या काठाच्या साड्या तसेच रंगीत कागद, पुठ्ठा इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याद्वारे आकर्षक असे आकाशकंदील बनविले.

Article image


मुलांमधील सृजनशीलता, सौंदर्य दृष्टिकोन, कृतीशीलता, संघभावना ही मूल्ये रुजवण्यासाठी तसेच टाकाऊ पासून शोभिवंत वस्तू तयार करता याव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेसाठी कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.


पर्यावरण पूरक कंदील बनविल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांची प्रशंसा केली. 


कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी कार्यशाळेला विशेष शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स