ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवणात भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा.

प्रकाशन: 19 Oct 2025 12:13 AM
वाचन संख्या 354

मालवणात भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा.

Article image


हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्या वतीने आयोजन.


मालवण | ब्यूरो न्यूज : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्यावतीने आज, रविवार १९ ऑक्टोबर रोजी मालवण शहर भरड नाका येथे रात्री ९ वाजता 'भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक स्टेज मांडणी, एलईडी स्क्रीन अशा भव्यदिव्यतेत बहुसंख्य स्पर्धकांच्या सहभागातून ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने संयोजक प्रशांत हिंदळेकर व सह संयोजक भाऊ सामंत यांनी केले आहे.  


जयजयकार श्रीकृष्णाचा, वध नरकासुराचा हे ब्रीद घेऊन या स्पर्धेचे यावर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. 


स्पर्धा तीन गटात होत आहे. यात लहान गट - बालवाडी ते चौथी- अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, उत्तेजनार्थ दोन- ५०० रुपये, खुला गट - पुरुष- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये, खुला गट - महिला- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. 


स्पर्धकांना श्रीकृष्ण - वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. त्यासोबत राधा पात्र असले तरीही चालेल किंवा स्पर्धक एकट्याने सादरीकरण करू शकतात. वेशभूषा, साहित्य आणि सादरीकरणाची तयारी स्पर्धकांनी स्वतःहून करायची आहे. स्पर्धेत अजून काही नियम असल्यास स्पर्धेच्या ठिकाणी ते सांगण्यात येतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. 


स्पर्धेत मालवण सह जिल्ह्यातून उत्स्फूर्त पणे नाव नोंदणी होत आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अमित खोत - ९४०४४५७७८८ किंवा गणेश मेस्त्री ९४०४९१६८६९ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स