शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन.
शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे शासनाचे निर्देश असून 'आयुष्यमान भारत कार्ड' योजनेकरिता शिधापत्रिका ऑनलाईन असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता सर्व शिधापत्रिकाधारक पात्र असून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करावयाच्या आहेत. परंतु अद्याप पर्यत सर्व शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत. सर्व शिधापत्रिका धारक (NPH,केशरी, शुभ्र) यांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरीता संबंधित तहसिलदार कार्यालय, शासनाची rcms.mahafood.gov.in या वेबसाईट वरील पब्लिक लॉगीनचा वापर करुन किंवा CSC सेंटर मध्ये संपर्क करुन शिधापत्रिका ऑनलाईन करावयाची आहे. शिधापत्रिका ऑनलाईन झाल्यानंतरच 'आयुष्यमान भारत कार्ड' योजनेचा लाभ घेता येईल.
सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्यावी तसेच सर्व रास्त भाव दुकानदार यांनी, त्यांच्या रास्त भाव धान्य दुकानातील सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.