ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे याज्ञिक परीक्षेत सुयश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे याज्ञिक परीक्षेत सुयश.

वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे याज्ञिक परीक्षेत सुयश. 


मालवण | ब्यूरो न्यूज : पुणे येथे याज्ञिक परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या मालवण वायंगणी येथील सद्गुरू स्मार्त गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. या गुरुकुलातील दहा विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये स्मार्त प्रवेश परीक्षेत कुशल दामले, वेदांत गोगटे ह्या दोन विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, संपूर्ण अभिज्ञ परीक्षेत आर्य जोशी, विश्वेश कोवाडकर, श्रेयस कांदोळकर व वरद आठवले ह्या चार विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, शार्दुल रामतीर्थकर द्वितीय श्रेणी, साहिल गांगल तृतीय श्रेणी प्राप्त केली आहे. संपूर्ण कोविद परीक्षेत गोविंद दामले व ओम जोशी या विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त करून सद्गुरु स्मार्त गुरूकुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. 

Article image


पुणे येथील सहस्त्रबुद्धे महाराज मंदिर व वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे येथे विविध परीक्षांसाठी हे विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना वे. मू. याज्ञिक चूडामणी नंदकिशोर केशव जोशी यांचे मार्गदर्शन लाभले असून संपूर्ण, या सर्व विद्यार्थ्यांचे व गुरुजनांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स